न्यूयॉर्क : अमेरिकन अंतराळ संस्था नासा नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर अंतराळातील फोटो आणि व्हिडिओ टाकत असते. आता परत एकदा नासाने आपल्या इंस्टाग्रामवर अंतराळातील एक चकीत करणारा व्हिडिओ टाकला आहे. नासाने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. असेच हा व्हिडीओ पाहून सर्वजण चकित होताना दिसत आहे.
नासाने वर्णनात्मक कॅप्शनसह एक व्हिज्युअलाइज्ड व्हिडिओ शेअर केला आहे. “दृश्यमान प्रकाशाद्वारे खगोलीय वस्तू पाहताना-मानवी डोळा पाहू शकणारा प्रकाश-धूळचे दाट ढग छायादार दिसू शकतात. या नेबूलाच्या आश्चर्यकारक, अलौकिक इच्छा पकडण्यासाठी, हबल स्पेस टेलिस्कोप इन्फ्रारेड लाइट बनतो”, असे कॅप्शन नासाने आपल्या पोस्टसह दिले आहे.
View this post on Instagram
पुढच्या काही ओळींमध्ये, नासाने व्हिज्युअलमध्ये दाखवलेल्या हॉर्सहेड नेबुलाचे वर्णन केले आहे. “ओरियन नक्षत्रात अंदाजे 1,500 प्रकाश-वर्षांच्या अंतरावर असलेल्या, हॉर्सहेड नेबुला रात्रीच्या आकाशातील सर्वात ओळखण्यायोग्य निहारिकांपैकी एक आहे.
हे वैज्ञानिक व्हिज्युअल नेबुलाच्या इन्फ्रारेड दृश्याद्वारे फ्लाइटचे अनुकरण करते, तो आश्चर्यकारक वैश्विक चित्र जिवंत करतो”, असेही नासाने आपल्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला आतापर्यंत 56 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसेच, या व्हिडिओवर युझर अनेक कमेंट्स करत आहेत.