Bernard Julien : वेस्ट इंडिजचा दिग्गज हरपला; वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आंतरराष्ट्रीय कारकीर्द आणि योगदान –
बर्नार्ड जूलियन यांनी 24 कसोटी आणि 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये वेस्टइंडीजचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 68 बळी घेतले आणि 952 धावा केल्या. स्विंग गोलंदाजी आणि विश्वासार्ह फलंदाजी यासाठी ते प्रसिद्ध होते. 1975 च्या विश्वचषकात त्यांनी श्रीलंके विरुद्ध 20 धावांत 4 बळी आणि उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध 27 धावांत 4 बळी घेतले. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी 37 चेंडूत नाबाद 26 धावांची उपयुक्त खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
Statement on the Passing of Legend Bernard Julien by Dr. Kishore Shallow, President of Cricket West Indies.
Read More 🔽https://t.co/cwYl3btsC7
— Windies Cricket (@windiescricket) October 5, 2025
काउंटी क्रिकेट ते अचानक थांबलेली कारकीर्द –
जूलियन यांनी 1970 ते 1977 या काळात इंग्लंडच्या केंट काउंटी संघाकडून खेळले. मात्र, 1982-83 मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला, ज्यावर त्या काळात रंगभेद धोरणामुळे (Apartheid) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बंदी होती. वेस्टइंडीज क्रिकेट मंडळाच्या परवानगीशिवाय “बंडखोर वेस्टइंडीज संघा”सह या दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंवर आयसीसी आणि वेस्टइंडीज क्रिकेट मंडळाने आजीवन बंदी घातली. यामुळे जूलियन यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अचानक संपुष्टात आली.
हेही वाचा – IND vs AUS : रोहित-विराटची कारकीर्द संपुष्टात? गंभीर-आगरकरचा ‘सीक्रेट प्लॅन’ उघड! नेमकं कारण काय? जाणून घ्या
क्रिकेट वेस्ट इंडिजकडून श्रद्धांजली –
क्रिकेट वेस्टइंडीज (CWI) चे अध्यक्ष डॉ. किशोर शैलो यांनी जूलियन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांचे योगदान अमूल्य असल्याचे सांगितले. “तो काळ बहिष्काराच्या दृष्टिकोनातून नव्हे, तर समजुतीने पाहिला पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले. क्रिकेट मंडळाने जूलियन यांच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींप्रति संवेदना व्यक्त केली आणि त्यांची क्रिकेटमधील वारसा कायम स्मरणात राहील, असे म्हटले आहे.





