India World Schedule : एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर! भारताचे कधी अन् कोणाशी होणार सामने? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
India World Schedule : २०२७ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे गट आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावेळी स्पर्धेचे स्वरूपही बदलण्यात आले आहे. परिणामी, भारतीय संघाचे वेळापत्रक पूर्वीपेक्षा अधिक व्यस्त असणार आहे.

ICC ODI World Cup 2027 Team India Full Schedule Australia Opener Pakistan Clash : आयसीसीने आगामी आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक २०२७ चे (ICC ODI World Cup 2027) सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ही महास्पर्धा २ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२७ दरम्यान रंगणार आहे. भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात ७ ऑक्टोबर रोजी केपटाऊन येथे पाच वेळच्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्याने करणार आहे. या साखळी फेरीत टीम इंडियाला एकूण ५ सामने खेळावे लागतील.
१० ऑक्टोबरला महामुकाबला; जोहान्सबर्गमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान लढत!
यंदाच्या विश्वचषकातील सर्वात बहुप्रतिक्षित आणि प्रतिष्ठेची भारत विरुद्ध पाकिस्तान लढत रविवार, १० ऑक्टोबर रोजी जोहान्सबर्गच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवली जाईल. यानंतर १४ ऑक्टोबर रोजी भारताचा सामना त्शवाने येथे अफगाणिस्तानविरुद्ध, तर १७ ऑक्टोबरला ब्लोमफॉन्टेनमध्ये क्वालिफायर ‘ए’ संघाविरुद्ध होईल. भारतीय संघ साखळी फेरीतील अखेरचा सामना २४ ऑक्टोबर रोजी व्हिक्टोरिया फॉल्स येथे यजमान झिम्बाब्वेविरुद्ध खेळेल.
भारताच्या साखळी फेरी सामन्यांचे वेळापत्रक:
𝗧𝗵𝗲 𝘄𝗮𝗶𝘁 𝗶𝘀 𝗼𝘃𝗲𝗿! ⌛
Here’s a look at #TeamIndia‘s group stage fixtures for the ICC Men’s Cricket World Cup 2️⃣0️⃣2️⃣7️⃣ 🇮🇳 🗓️#CWC27 pic.twitter.com/0iUNMRfymW
— BCCI (@BCCI) October 1, 2026
- ७ ऑक्टोबर २०२७: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (केपटाऊन)
- १० ऑक्टोबर २०२७: भारत विरुद्ध पाकिस्तान (जोहान्सबर्ग)
- १४ ऑक्टोबर २०२७: भारत विरुद्ध अफगाणिस्तान (त्शवाने)
- १७ ऑक्टोबर २०२७: भारत विरुद्ध क्वालिफायर ए (ब्लोमफॉन्टेन)
- २४ ऑक्टोबर २०२७: भारत विरुद्ध झिम्बाब्वे (व्हिक्टोरिया फॉल्स)
अव्वल तीन संघ गाठणार ‘सुपर स्टेज’; सेमीफायनलसाठी खेळावे लागतील ६ सामने!
The #CWC27 groups are locked ⚡🔐
A cricketing extravaganza awaits! How to watch the schedule launch ➡️ https://t.co/Eod5GoN7zW pic.twitter.com/oVg7zVHLNF
— ICC (@ICC) October 1, 2026
स्पर्धेच्या रचनेनुसार, भारतीय संघाने आपल्या गटात गुणतालिकेत अव्वल तीनमध्ये (Top-3) स्थान मिळवल्यास त्यांना ‘सुपर स्टेज’ फेरीचे तिकीट मिळेल. दोन्ही गटांमधून एकूण ७ संघ या फेरीत दाखल होतील. त्यामुळे भारतीय संघाला अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी सुपर स्टेज फेरीत आणखी ६ सामने खेळावे लागतील. तेथून अव्वल चार संघ थेट उपांत्य फेरीत धडक मारतील.
केपटाऊन-त्शवानेत उपांत्य फेरी; २१ नोव्हेंबरला जोहान्सबर्गमध्ये महाफायनल!
स्पर्धेचे उपांत्य सामने १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी अनुक्रमे केपटाऊन आणि त्शवाने येथे खेळवले जातील. तर विश्वविजेतेपदाचा महाअंतिम सामना रविवार, २१ नोव्हेंबर २०२७ रोजी जोहान्सबर्गच्या मैदानावर पार पडेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०२३ मध्ये निसटलेले विश्वविजेतेपद पटकावण्यासाठी भारतीय संघ यंदा आफ्रिकन भूमीवर कसून तयारी करत उतरणार आहे.





