West Bengal Results : पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये मोठे उलटफेर पाहायला मिळत असून, अनेक ठिकाणी चित्र बदलताना दिसत आहे. आसाममध्ये भारतीय जनता पक्ष स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असून, तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची शक्यता निर्माण झाली आहे. तर पुडुचेरीतही भाजप आघाडीवर असून बहुमत निश्चित मानले जात आहे. (West Bengal Results) केरळमध्ये मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. डाव्या पक्षांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या राज्यात काँग्रेस पक्ष मोठी आघाडी घेत असून सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. भाजपला मोठा धक्का दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीला भाजपने मोठी आघाडी घेत तृणमूल काँग्रेस ला धक्का दिला होता. भाजप २०० पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र होते, तर तृणमूल काँग्रेस पिछाडीवर दिसत होती. त्यामुळे राज्यात सत्तांतराची चर्चा रंगली होती. (West Bengal Results) मात्र, आता चित्रात मोठा बदल झाला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघात सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी जोरदार पुनरागमन करत आघाडी घेतली आहे. भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात त्या सुमारे पाच हजार मतांनी पुढे गेल्या आहेत. (West Bengal Results) चित्र बदललं मतमोजणीच्या अनेक फेऱ्यांमध्ये सुवेंदू अधिकारी आघाडीवर होते, मात्र अखेरच्या टप्प्यात आकडा फिरल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुवेंदू अधिकारी यांचे नाव चर्चेत असताना हा बदल भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. (West Bengal Results) या घडामोडींमुळे पश्चिम बंगालमध्ये पुढे नेमके कोण सत्तेत येणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.