West bengal assembly election results: भारतीय जनता पार्टी (भाजप) यावेळी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवताना दिसत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत भाजपने समोर येत असलेल्या कलांमध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप १४९ जागांवर आघाडीवर आहे, तर २९३ विधानसभा जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये बहुमताचा आकडा १४८ आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस ९२ जागांवर आघाडीवर आहे. (West bengal assembly election results) बंगालच्या २९३ विधानसभा जागांसाठी २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत मतदान झाले होते, आणि काही मतदारसंघांमध्ये अनियमिततेच्या तक्रारींनंतर २ मे रोजी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले. (West bengal assembly election results) West bengal assembly election results: बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा ; ममता बॅनर्जींना मोठा धक्का आज केवळ २९३ विधानसभा जागांसाठी मतमोजणी होत आहे, तर उर्वरित एका जागेवर नंतर फेरमतदान होईल. गंभीर अनियमितता, ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचे आरोप आणि हिंसाचाराच्या तक्रारींमुळे निवडणूक आयोगाने येथील मतदान रद्द केले आहे. (West bengal assembly election results) दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू आहे. भवानीपूर मतदारसंघ हा एक हॉटस्पॉट तर आहेच, पण त्याचबरोबर झाडग्राम मतदारसंघही चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, पंतप्रधान मोदींनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान याच मतदारसंघातील एका दुकानात झालमुरी खाल्ली होती, जी चर्चेचा विषय बनली होती. झाडग्राम मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. west bengal assembly election results: