West Bengal Result: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीदरम्यान प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. मतमोजणी केंद्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांच्यात जोरदार संघर्ष निर्माण झाला असून, गेल्या दीड तासांपासून याठिकाणी मतमोजणी थांबवण्यात आली आहे. “माझी मते लुटली जात आहेत,” असा खळबळजनक आरोप ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर केला आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, भवानीपूरच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तृणमूल काँग्रेसने (TMC) असा दावा केला आहे की, त्यांच्या एका मतमोजणी प्रतिनिधीला (Counting Agent) केंद्राबाहेर काढण्यात आले. ही माहिती मिळताच ममता बॅनर्जी स्वतः मतमोजणी केंद्रावर दाखल झाल्या. यावेळी तिथे भाजपचे सुवेंदु अधिकारी आधीपासूनच उपस्थित होते. दोन्ही बड्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे केंद्रावर तणाव शिगेला पोहोचला असून सुरक्षेच्या कारणास्तव मतमोजणी तात्पुरती थांबवण्यात आली आहे. हेही वाचा – प. बंगालमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? ‘या’ 5 दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत आकडेवारी काय सांगते? (१३ वी फेरी) निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, १३ व्या फेरीअखेर ममता बॅनर्जी आघाडीवर असल्या तरी चुरस कायम आहे: ममता बॅनर्जी (TMC): ४६,७२६ मते सुवेंदु अधिकारी (BJP): ४१,३७७ मते प्रदीप प्रसाद (INC): ८३१ मते आघाडी: ममता बॅनर्जी ५,३४९ मतांनी आघाडीवर. हेही वाचा – मोठा राजकीय भूकंप! स्वतःच्या बालेकिल्ल्यात थेट मुख्यमंत्र्यांचाच झाला पराभव भाजपच्या प्रचाराचा ‘सणसणीत’ प्रभाव? West Bengal Result: ममता बॅनर्जी म्हणाल्या – “माझी मते लुटली जात आहेत,” मतमोजणी थांबली, नेमकं काय घडतंय? या निवडणुकीत भाजपची रणनीती टीएमसीसाठी डोकेदुखी ठरल्याचे चित्र आहे. तृणमूलच्या व्यासपीठावरून गायल्या गेलेल्या ‘हृदय माछे काबा, नयन-ए-मदीना’ या गाण्यावरून भाजपने ‘तुष्टीकरणा’च्या मुद्द्यावर जोरदार हल्ला चढवला होता. मतदारांमध्ये या मुद्द्याचा मोठा प्रभाव पडल्याचे बोलले जात आहे. ममता बॅनर्जींची ‘मा, माटी, मानुष’ ही घोषणा यावेळी भाजपच्या ‘जय श्रीराम’ आणि ‘जय माँ काली’च्या आक्रमक प्रचारासमोर काहीशी फिकी पडल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.