पश्चिम बंगालमधील भाजप उमेदवाराच्या घरी तोडफोड
Updated On:

कोलकाता – पश्चिम बंगालमधील भाजपच्या उमेदवार लोकेट चॅटर्जी यांच्या राहत्या घरी तोडफोड करण्यात आली आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली असल्याचा आरोप केला आहे.
शुक्रवारी (19 एप्रिल) सकाळी चॅटर्जी प्रचारासाठी गेलेल्या असताना त्यांच्या घरात तोडफोड करण्यात आली. तसेच त्यांच्या घरातील काही किमतीऐवज देखील चोरीला गेला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लोकेट चॅटर्जी यांनी भाजपकडून हुगळी मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. त्या सध्या बांदेल भागात भाड्याच्या घरात राहतात.




