West Bank Attack : वेस्ट बँकेमध्ये (West Bank Attack) इस्रायली सैनिकांनी एका कारवर केलेल्या गोळीबारामध्ये एकाच कुटुंबातील चौघेजण ठार झाले. त्यामध्ये २ लहान मुलांचाही समावेश आहे, असे पॅलेस्टीनी ऍथोरिटीच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. हे कुटुंब येत्या ईद अल-फित्रच्या सुट्टीसाठी नवीन कपड्यांच्या खरेदीसाठी बाहेर पडले होते. शनिवारी रात्री उशिरा या कुटुंबावर गोळीबार (West Bank Attack) करण्यात आला होता. अली आणि वैद ओदेह आणि त्यांच्या चार मुलांपैकी दोघांना डोक्यात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. West Bank Attack या गोळीबारानंतर (West Bank Attack) घटनास्थळी रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध करून दिली जायला इस्रायली सैनिकांनी उशीर केला, असा आरोप पॅलेस्टीनियन रेड क्रेसेंट बचाव सेवेने केला. या गोळीबाराची चौकशी केली जात आहे, असे इस्रायलने सांगितले. तम्मुनमध्ये एक कार त्यांच्या दिशेने वेगाने आल्यानंतर सैन्याने गोळीबार केला, असे इस्रायलच्या लष्कर आणि पोलिसांनी रविवारी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. कारमधील व्यक्ती दहशतवादी कृत्यातील संशयित असल्याने सैन्याने हा गोळीबार केला, असे या निवेदनात म्हटले आहे.