सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदे करणार ‘लग्न’ ?

Television । छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदेला कोणत्याही ओळखीची गरज नाही. ‘मायका’, ‘भाबीजी घर पर हैं’सह अनेक शोमध्ये काम करून तिने चाहत्यांच्या हृदयात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे. तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच ही अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते. आता ती तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे.
अशात ‘अंगुरी भाभी’च्या लग्नाची बातमी ऐकून तिचे चाहतेही खूप उत्सूक झाले आहेत. शिल्पा कधी आणि कोणासोबत लग्न करणार आहे हे जाणून घेण्यासाठी ते उत्सुक आहेत. शिल्पाच्या लग्न खर्च होणार आहे काय असा प्रश्नही सोशल मीडियावर विचारला जात आहे.
अलीकडे ही अभिनेत्री खतरों के खिलाडी 14 या रिॲलिटी शोचा भाग बनली आहे. मात्र, काही दिवसांनी ती शोमधून बाहेर पडली. येथूनच अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी समोर आली. शिल्पाचे नाव सध्या अभिनेता आणि खतरों के खिलाडी अभिनेता करणवीर मेहरासोबत जोडले जात आहे.
करणवीरने एका स्टंटदरम्यान अभिनेत्रीला सांगितले होते की, जर आपण हा स्टंट जिंकला तर आपण लग्न करू आणि येथून ‘भाबीजी फेम’च्या लग्नाच्या बातम्यांना उधाण आले. करणवीर आधीच विवाहित आहे, त्याने दोनदा लग्न केले आहे. करणच्या लग्नाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली होती की,’नाही, यामुळे आपल्या दोघांची अडचण होऊ शकते.’असेही तिने सांगितले
दरम्यान, शिल्पा शिंदे 47 वर्षांची आहे आणि तिने अद्याप लग्न केलेले नाही, परंतु अभिनेत्रीने 2009 मध्ये रोमित राजसोबत एंगेजमेंट केली होती. लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या, पण नंतर लग्न मोडले. केवळ टीव्ही शोच नाही तर शिल्पा शिंदेने रिॲलिटी शो बिग बॉस सीझन 11 चे विजेतेपदही पटकावले आहे.





