नववर्षाचे जगभरात जल्लोषात स्वागत
Updated On:

नवी दिल्ली – जगभरात विविध ठिकाणी गर्दीने फुललेले रस्ते, गुलाबी थंडीत मित्र-मैत्रिणी, कुटुंबीयांसमवेत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जमलेले नागरिक, मनपसंत खाद्यपदार्थ, संगीत आणि खरेदीचा आनंद घेत आणि रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेले “काऊंटडाउन’ आणि घड्याळात बाराचा ठोका पडताच झालेला “हॅपी न्यू इयरचा’ जल्लोष… अशा उत्साही वातावरणात बुधवारी मध्यरात्री नववर्षाचे स्वागत केले.





