Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला ! धुळ्यात १०.८ अंशांवर नीचांकी तापमान
Updated On:

मुंबई – हिमालयीन प्रभावामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका हळूहळू वाढत असून राज्यात मंगळवारी धुळे सर्वात कमी 10.8 अंश तर नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये 10.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.
संभाजीनगरमध्ये पारा 14.4 वर होता. राज्यात दोन दिवसांपासून तापमान घसरत आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत थंडीचे प्रमाण अधिक आहे, तर मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीपेक्षा 1 ते 2 अंश सेल्सियसने कमी आहे.





