Mardini First look : हातात शस्त्र, डोळ्यांत अंगार… प्रार्थना बेहेरेच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर
Mardini First look : आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली अभिनेत्री प्रार्थना बेहेरे एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Mardini First look : मराठी चित्रपटसृष्टीतील चित्रपटांमध्ये आता नवीन आणि वेगळे विषय समोर यायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पूजा सांवत हिची मुख्य भूमिका असलेला सालबर्डी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
या चित्रपटाला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. पूजाच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. या चित्रपटात महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका तिने साकारली होती.
यानंतर आता आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली अभिनेत्री प्रार्थना बेहेरे एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तिच्या आगामी मर्दिनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. (Mardini First look)
View this post on Instagram
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रार्थना बेहेरेचा अंगावर काटा आणणारा लूक चर्चेचा विषय ठरत आहे. या अभिनेत्रीने स्वतः इंन्स्टाग्रामवरुन चित्रपटातील तिचा लूक शेअर केला आहे.
माय हायेस तू माय.. लेकरांसाठी ज्योत बी पेटवू शकते आणि भ्येकरांसाठी चिता बी. सादर करत आहोत “मर्दिनी” या आमच्या चित्रपटाचे पहिलं पोस्टर असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. (Mardini First look)
या लूकमध्ये प्रार्थनाच्या हातात एक कुऱ्हाड दिसत असून, डोळ्यात अंगार दिसत आहे. शरीरावर जखमा असून सूडाच्या भावनने ती पेटून उठल्याचे दिसत आहे. या लूकमुळे प्रार्थनाच्या चाहत्यांना चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता वाढलेली आहे. (Mardini First look)
मर्दिनी हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. पडद्यावर विविध छटांमध्ये दिसलेला अभिनेता श्रेयश तळपदे आता ‘मर्दिनी ‘च्या निमित्ताने पुन्हा निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. (Mardini First look)
यापूर्वी त्याने ‘पोश्टर बॉइज’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. आता त्याने ‘आई तारी तिला कोण मारी’ अशी टॅगलाइन असलेल्या ‘मर्दिनी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.
या चित्रपटात प्रार्थनासह अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी आणि राजेश भोसले यांसारखे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार असून, बालकलाकार मायरा वैकुळसुद्धा चित्रपटात दिसणार आहे. अजय मयेकर याचा ‘मर्दिनी’ हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे.




