Deool Band 2 Box Office Collection : पहिल्याच दिवशी चमत्कार! ‘देऊळ बंद 2’ ची दमदार सुरुवात, पहा फर्स्ट डे कलेक्शन
Deool Band 2 Box Office Collection : महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये चित्रपटाचे शो पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल झाल्याचं पाहायला मिळालं.

Deool Band 2 Box Office Collection : 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद या सुपरहिट चित्रपटाने श्रद्धा आणि विज्ञान यांचा अनोखा संगम साकारत मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं.
तब्बल 11 वर्षांनंतर आलेल्या त्याच्या सिक्वेल देऊळ बंद २ ने दमदार एन्ट्री करत बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी मोठी कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवला आहे. (Deool Band 2 Box Office Collection)
पारंपरिक शुक्रवारऐवजी गुरुवारी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर आणि गुरुपुष्यामृत योग साधत चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे, सकाळी सहा वाजताच्या पहिल्याच शोला प्रेक्षकांनी थिएटरमध्ये मोठी गर्दी केली होती.
महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये चित्रपटाचे शो पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल झाल्याचं पाहायला मिळालं. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, जळगाव, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ‘देऊळ बंद 2’ ( Deool Band 2 ) ची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. (Deool Band 2 Box Office Collection)

Deool Band 2 Box Office Collection : पहिल्याच दिवशी चमत्कार! ‘देऊळ बंद 2’ ची दमदार सुरुवात, पहा फर्स्ट डे कलेक्शन
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी 1,175 शोजमधून तब्बल 2.45 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं आहे. तर एकूण ग्रॉस कलेक्शन 2.89 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. मराठी चित्रपटासाठी ही धडाकेबाज ओपनिंग मिळाली आहे.
सोशल मीडियावरही चित्रपटाची जोरदार चर्चा असून, प्रेक्षकांनी चित्रपटातील दमदार कथानक, भावनिक प्रसंग, संवाद, संगीत आणि कलाकारांच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं आहे.
या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संवाद-लेखन प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केलं आहे. त्यांच्या वास्तववादी मांडणीमुळे आणि प्रभावी कथनशैलीमुळे चित्रपट अधिक उठावदार ठरल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत.
चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत झळकले आहेत. त्यांच्या प्रभावी अभिनयाला आणि संवादफेकीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे.
वटवृक्ष इंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाची निर्मिती कैलास वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे. उत्कृष्ट छायांकन, प्रभावी पार्श्वसंगीत आणि भव्य सादरीकरणामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा : Amitabh Bachchan: झुरळाची भन्नाट गोष्ट! केबीसीमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितलेला किस्सा पुन्हा चर्चेत





