Picture Boys : ‘छोट्या पुढारी’चा मोठ्या पडद्यावर धमाका; ‘पिक्चर बॉईज’मधून पहिली एन्ट्री
Picture Boys : पिक्चर बॅाइज या सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून, या सिनेमातून घनश्याम दरोडे मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

Picture Boys : उन्हाळ्याच्या सुटीत प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज असलेल्या ‘पिक्चर बॉईज’ या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 15 मे रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार असून, हिरो बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दोन तरुणांची मजेशीर आणि धमाल गोष्ट यात पाहायला मिळणार आहे. Picture Boys
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आलेले ‘छोटा पुढारी’ घन:श्याम दरोडे या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. कोणत्याही पक्षाशी थेट संबंध नसतानाही सामाजिक आणि राजकीय विषयांवर परखड मत मांडणारा घन:श्याम ‘बिग बॉस’मुळे अधिक प्रसिद्ध झाला. आता त्याची सिनेसृष्टीतील एन्ट्री अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरली आहे. Picture Boys

Picture Boys : ‘छोट्या पुढारी’चा मोठ्या पडद्यावर धमाका; ‘पिक्चर बॉईज’मधून पहिली एन्ट्री
‘पिक्चर बॉईज’ (Picture Boys ) मध्ये सिनेमासृष्टीबद्दल काहीही माहिती नसलेल्या दोन तरुणांची हिरो बनण्याची धडपड दाखवण्यात आली आहे. या प्रवासात त्यांना येणारे अनुभव, त्यातून निर्माण होणारे विनोदी प्रसंग आणि संघर्ष यांची रंगतदार मांडणी करण्यात आली आहे. Picture Boys
सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, कथानक, हलकं-फुलकं विनोदी लेखन, लक्षात राहणार संगीत आणि दमदार अभिनय ही या सिनेमाची वैशिष्ट्ये ठरणार आहेत. एकूणच उन्हाळ्याच्या सुटीत कुटुंबासह पाहण्यासारखा मनोरंजक सिनेमा म्हणून ‘पिक्चर बॉईज’कडे पाहिले जात आहे. Picture Boys
घनश्याम दरोडे हा छोटा पुढारी या सिनेमामुळे चर्चेत आला होता. हा सिनेमा फारसा चालला नसल्या तरी घनश्यामची चर्चा झाली. त्यानंतर तो बिग बॅासमध्ये दिसला. येथूनच खऱ्या अर्थाने त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. Picture Boys




