Hrithik Roshan : ‘आपल्याला अजून कितीतरी गोष्टी एकत्र करायच्या होत्या, पण…’; मित्र अचानक सोडून गेल्याने हृतिक पूर्ण खचला, लिहिली भावुक पोस्ट
Hrithik Roshan : आपल्या जवळच्या मित्राच्या अचानक जाण्याने हृतिक रोशनला मोठा धक्का बसला आहे. त्याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत संजय गुप्ता यांना श्रद्धांजली वाहिली.

Hrithik Roshan : प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या अकाली निधनाने बॅालिवूडला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी अनेक चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अभिनेता हृतिक रोशन याची प्रमुख भूमिकेतील ‘काबिल’ या चित्रपटाच्या दिग्दर्शन त्यांनी केले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने संजय आणि हृतिक यांच्यात केवळ व्यावसायिक नातं निर्माण झालं नाही, तर दोघांमध्ये घट्ट मैत्रीही झाली होती.
आपल्या जवळच्या मित्राच्या अचानक जाण्याने हृतिक रोशनला मोठा धक्का बसला आहे. त्याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत संजय गुप्ता यांना श्रद्धांजली वाहिली. ‘आपल्याला अजून कितीतरी गोष्टी एकत्र करायच्या होत्या, पण तू खूप लवकर निघून गेलास,’ अशा शब्दांत हृतिकने आपले दु:ख व्यक्त केलं. तसेच संजीय यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थनाही त्याने केली.
संजय गुप्ता यांचा राहत्या घरी बाथरूममध्ये पाय घसरून अपघात झाल्याने मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी धाव घेतली. त्यांच्या निधनाने मित्रपरिवारासह संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे अनेक व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होत आहेत.
Sanjay , I’m gonna miss you man. One film with you wasn’t enough … I will always remember our time together with so much love for you .. your laughter, your passion , that child in you that lit up with every good idea , there was so much more we needed to do together man , this is way too soon 💔
Im gonna remember you with so much gratitude my friend , I wish I had hugged you harder and thanked you for giving me the best experience of my life with kaabil. Nobody will fully know how much you gave that film. I’m heartbroken , this was too soon.
Strength to the family …
Rest in peace my friend …— Hrithik Roshan (@iHrithik) October 31, 2026
हृतिक रोशनने पोस्टमध्ये काय म्हटलं?
हृतिकने लिहिलं, “संजय, तुझी खूप आठवण येईल. तुझ्यासोबत केलेला एक चित्रपट पुरेसा नव्हता. आपण एकत्र घालवलेला वेळ माझ्या स्मरणात नेहमीच प्रेमाने राहील. तुझं हास्य, तुझा उत्साह आणि तुझ्यातील ते निरागस मूल, जे प्रत्येक चांगल्या कल्पनेवर आनंदाने उजळून निघायचं. आपल्याला अजून कितीतरी गोष्टी एकत्र करायच्या होत्या, पण तू खूप लवकर निघून गेलास.”
पुढे हृतिकने पोस्टमध्ये म्हटले की, “मित्रा, मी तुला सदैव कृतज्ञतेने स्मरणात ठेवेन. किती बरे झाले असते जर मी तुला अधिक घट्ट मिठी मारली असती आणि ‘काबिल’ चित्रपटाच्या निमित्ताने माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव दिल्याबद्दल तुझे आभार मानले असते! तू त्या चित्रपटाला किती योगदान दिले, हे कदाचित कोणालाच पूर्णपणे कळणार नाही. माझे हृदय तुटले आहे, तू खूप लवकर निघून गेलास. कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो…शांततेत विश्रांती घे, मित्रा…असं पोस्टच्या शेवटी हृतिकने लिहिलं आहे.





