“भारतीय म्हणून एकत्र राहिले पाहिजे, पुढची सुट्टी फक्त काश्मीरमध्येच…”; सुनील शेट्टीचे आवाहन

Sunil Shetty Pahalgam Terror Attack | पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यातच काही दिवसांपूर्वी अभिनेता सुनील शेट्टीच्या ‘केसरी वीर’ चित्रपटाच्या निर्मात्यांनीही हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होणार नसल्याचा निर्णय घेतला.
यानंतर आता सुनील शेट्टीने देखील पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देत भारतीयांना आवाहन केले आहे. सुनील शेट्टीने कश्मीर आपलं होतं आणि कायम आपलं राहिलं, आपण पुढच्या सुट्ट्या या कश्मीरमध्ये घालवा, असे आवाहन केले आहे.
सुनील शेट्टीनं एका अवॉर्ड शोनंतर मीडियाशी बोलताना सांगितले की, ‘आपल्यासाठी मानवतेची सेवा ही ईश्वर सेवा आहे. देव सगळं पाहतोय आणि योग्य न्याय तोच करेल. पण आता आपण भारतीय म्हणून एकत्र राहिलं पाहिजे. भीती आणि द्वेष पसरवणाऱ्यांच्या जाळ्यात अडकायचं नाही. त्यांना दाखवायचं आहे की आम्ही घाबरत नाही. कश्मीर आपलं होतं आणि आमचं आहे आणि कायम आपलं राहणार आहे.’
पुढची सुट्टी फक्त काश्मीरमध्येच…
सुनील शेट्टीनं पुढे सांगितलं की, “भारतीय नागरिक म्हणून आपण आपली पुढची सुट्टी ही कश्मीरमध्ये घालवण्यासाठी प्लॅन केला पाहिजे. आपण नागरिक म्हणून एक काम करायला हवं. आपली पुढची सुट्टी फक्त काश्मीरमध्येच असेल यासाठी आपण आतापासून सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. आपल्याला त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की आपल्याला भीती नाही.” Sunil Shetty Pahalgam Terror Attack |
त्यानं पुढे सांगितलं की, ‘कश्मीरमध्ये जाण्यास सांगितलं तर मी तयार आहे. जर उद्या तुम्हाला वाटतं की आपण तिथे जायला हवं, पर्यटक किंवा कलाकार म्हणून जर तिथे शूटिंग करायची असेल किंवा फिरायचं आहे, आम्ही नक्कीच येऊ.’ Sunil Shetty Pahalgam Terror Attack |
दरम्यान, काश्मीरमधील पहलगाम येथील बैसारन खोऱ्यात 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात 27 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या हल्ल्याबाबत देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. Sunil Shetty Pahalgam Terror Attack |
हेही वाचा:
राजगड किल्ल्यावर बेकायदेशीर पुतळा उभारण्याचा प्रयत्न; पुरातत्व विभागाच्या सतर्कतेमुळे साहित्य जप्त





