Fire in Pahalgam: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये भीषण आग ! गॅस सिलेंडरच्या स्फोटांनी परिसर हादरला ; तीन हॉटेल्स जळून खाक
Fire in Pahalgam: जम्मू-काश्मीरच्या पहलगामच्या लारीपोरा भागात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी तीन हॉटेल्सना भीषण आग लागली आहे.

Fire in Pahalgam: जम्मू-काश्मीरच्या पहलगामच्या लारीपोरा भागात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी तीन हॉटेल्सना भीषण आग लागली आहे.
आग विझवण्यासाठी पहलगाम, सल्लार, अनंतनाग आणि अश्मुकाम येथील अग्निशमन दले घटनास्थळी दाखल झाली आहेत.
पहलगाम अग्निशमन विभागाचे अधिकारी मुंझूर अहमद म्हणाले, “दोन-तीन इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. त्यामुळे आम्ही मदतकार्य करू शकलो नाही.”
सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहेत.
आगीच्या रौद्ररुपामुळे मदतकार्यात अडथळा Fire in Pahalgam:
मिळालेल्या माहितीनुसार, लारीपोरा याठिकाणी हॉटेलमध्ये अचानक आग लागली आणि काही क्षणातच तिने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच पहलगामसह सल्लार, अनंतनाग आणि अश्मुकाम येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
मात्र, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या हॉटेलमधील गॅस सिलिंडरचे एकामागून एक भीषण स्फोट होऊ लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना मदतकार्यात मोठ्या अडचणी आल्या. स्फोटांच्या तीव्रतेमुळे काही काळ मदतकार्य थांबवावे लागले होते.
कोट्यवधींचे नुकसान
‘असल रिसॉर्ट्स’चे व्यवस्थापक उमर हुसैन यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, “ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आमच्या रिसॉर्टच्या तीन प्रमुख इमारतींना आगीने वेढले. यात आमचे सुमारे ५० ते ६० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.”
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र शॉट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
कोणतीही जीवितहानी नाही Fire in Pahalgam:
पहलगाम अग्निशमन विभागाचे अधिकारी मंजूर अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ते तीन इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रशासनाकडून आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात असून, आग पूर्णपणे विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.






