Akanksha & Gaurav Khanna Divorce: “आम्ही एकमेकांसाठी योग्य नाही”; आकांक्षाचा पती गौरव खन्नासोबत घटस्फोट
Akanksha & Gaurav Khanna Divorce : आकांक्षाचा ‘लॉक अप २’ या शोमध्ये मोठा खुलासा

Akanksha & Gaurav Khanna Divorce : बिग बॉस १९ चा विजेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. धक्कादायक म्हणजे दोघेही वर्षभरापासून वेगळे राहत आहेत. नुकतेच आकांक्षाने ‘लॉक अप २’ या शोमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याचा मोठा खुलासा केला आहे.
‘लॉक अप २’ हा रियलिटी शो नेटफ्लिक्सवर सुरू झाला असून त्याचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आहे. या शोमध्ये आकांक्षा चमोला देखील स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये तिने पती गौरव खन्नासोबत घटस्फोट घेत असल्याचे सांगत सर्वांना मोठा धक्का दिला.
View this post on Instagram
बिग बॉस १९ शोच्या फॅमिली वीकमध्ये गौरवला भेटायला आकांक्षा चमोला आली होती. दोघेही खूप प्रेमाने एकमेकांशी वागत होते. त्यानंतरही दोघेही सगळं आलबेल असल्याचं दाखवत होते, पण आता मात्र आकांक्षाने घटस्फोटाबद्दल सांगितल्याने सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरू आहे.
आकांक्षाने सांगितलं की, “आम्ही दोघे गेल्या एक वर्षापासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत आणि ही गोष्ट आतापर्यंत कोणालाच माहित नव्हती. दोघांनीही परस्पर संमतीने हा निर्णय घेतला असून, गेल्या एक वर्षापासून ते या विषयावर चर्चा करत आहेत. आमच्या दोघांचं नातं खराब झालेलं नाही, तर आम्हा दोघांनाही असं वाटतं की जोडीदार म्हणून आम्ही एकमेकांसाठी योग्य नाही. कारण आमच्या दोघांच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत.”
दरम्यान, काही काळ डेट केल्यावर गौरव खन्ना व आकांक्षा चमोला यांनी २०१६ मध्ये लग्न केलं. गौरव आकांक्षापेक्षा ९ वर्षांनी मोठा असून त्यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. पण दोघांचा संसार मोडत असल्याने अनेकजण चकित झाले आहेत.
हेही वाचा:





