Gaurav Khanna And Akanksha : ‘बिग बॉस 19’ चा विजेत्याच्या संसारात घटस्फोटाचं वादळ? पत्नीच्या ‘त्या’ पोस्टने चर्चांना उधाण

Gaurav Khanna And Akanksha : मनोरंजन विश्वातील काही कलाकारांनी घटस्फोट घेत अनेक वर्षांचा संसार मोडला. यातच आता आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याचा संसार मोडल्याचं बोललं जात आहे. ‘बिग बॉस 19’ चा विजेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला वेगळे होणार असल्याच्या चर्चा सुरू होत आहेत.
आकांक्षाने एक पोस्ट लिहिल्याने दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हंटले जात आहे. आकांक्षाने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने लिहिले आहे की, “ज्या नात्याचा पाया केवळ गरजेवर आधारलेला असतो, तिथे मन नेहमीच बलिदान देतं. जेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही तयार आहोत, तेव्हा आम्ही तयार नव्हतो.”
View this post on Instagram
आकांक्षाच्या या पोस्टनंतर ‘अनेकांनी सर्व काही ठीक आहे का?’ अशी विचारणा केली आहे. तर काहींनी हा प्रमोशनचा फंडा असल्याचेही म्हंटले आहे. तर काहीजण आकांक्षा आणि गौरवमध्ये बिनसल्यामुळे घटस्फोटाचा अंदाज लावत आहेत.
दरम्यान, बिग बॉस १९’ जिंकल्यानंतर या दोघांनी सोशल मीडियावर अनेक आनंदाचे क्षण शेअर केले होते. त्यामुळे अचानक केलेल्या या पोस्टमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र दोघांच्या विभक्त होण्याच्या केवळ अफवा आहेत की त्यात काही तथ्य आहे, हे अद्याप दोघांकडूनही अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही. Gaurav Khanna And Akanksha :
हेही वाचा:



