पुणे | नगर रस्ता, कळस भागात गुरुवारी पाणी बंद

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}– महापालिकेकडून येत्या गुरूवारी ( दि. २९) रोजी कुसमाडे वस्ती येथे नवीन टाकी ही मुख्य जलवाहिनीस जोडणे व ठाकरसी टाकीवरील स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तींचे काम हाती घेण्यात येणार आहे.
त्यामुळे गुरुवारी नगर रस्ता परिसरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर, शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे, असे पालिकेने कळवले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग :-
ठाकरसी टाकीवरील परिसर :- आदर्शनगर, कल्याणीनगर, हरीनगर, रामवाडी , शास्त्रीनगर
जागतिक जलवाहिनीवरील परिसर :- संपूर्ण गणेशनगर, म्हस्के वस्ती परिसर, कळस, माळवाडी, जाधव वस्ती, विशाल परिसर, विश्रांतवाडी स. नं. ११२ अ, कस्तुरबा, टिंगरेनगर पंप ते विश्रांतवाडी चौक, जय जवाननगर, जय प्रकाशनगर, संजय पार्क. विमानतळ, यमुनानगर, दिनकर पठारे वस्ती, पराशर सोसायटी, श्री पार्क, ठुबे-पठारेनगर इ.





