\nपरंतु, सरकारच्या मदतीने मिळालेला तो बैल दोनच दिवसांत शेतातील मशागतीदरम्यान खाली बसला. पशुवैद्यकीय तपासणीत तो आजारी असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी मदत मिळण्याऐवजी शेतकऱ्यावर आता त्या बैलाच्या उपचाराचा खर्च करण्याची वेळ आली आहे. यावरून रोहित पवार आणि कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत सरकारवर टीका केली आहे.  (Latur News)

\n
\"Rohit

Latur News : “मदत होती की बळीराजाच्या दुःखाची थट्टा?”; शेतकऱ्याला दिलेला बैल आजारी निघाल्याने सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

\n

\n

सरकारच्या नियतीतच खोट  (Latur News )

\n

रोहित पवारांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटलं की, “विरोधक आणि माध्यमांच्या दबावामुळं लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला नुकसानभरपाई म्हणून दिलेला बैल आजारी निघाला. आता त्याच्या उपचाराचाच खर्च संबंधित शेतकऱ्याला करावा लागतोय. शेतकरी कर्जमाफीची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. द्यायची म्हणून दिलेल्या कर्जमाफीमध्ये अटीशर्तीच जास्त लादून ती बहुतांश शेतकऱ्यांना मिळू नये याची अधिक काळजी घेतली.

\n

आता बैलावर उपचारासाठी स्वतःच्या खिशातील पैसे खर्चण्याची वेळ संबंधित शेतकऱ्यावर आली, त्याप्रमाणेच कर्जमाफीसाठीही सरकारने घातलेल्या अटींमुळं आधी स्वतःकडचे पैसे शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत. यातून या सरकारच्या नियतीतच खोट आहे, हे दिसतं. त्यामुळं आमची सरकारला विनंती आहे की, अन्नदात्याला द्यायचं ते हातचं राखून देऊ नका, तर निर्मळ आणि मोकळ्या मनानेच द्या! शेवटी तिजोरी ही जनतेची आहे.”

\n
\n

या सरकारला “दलिंदर सरकार” म्हणतो ते उगाच नाही!

\n

बैल मेल्यामुळे पत्नीला नांगराला जुंपण्याची वेळ आली… हा व्हिडिओ व्हायरल झाला, मग सरकार जागं झालं. मदतीसाठी एक बैल देण्यात आला… कॅमेरे आले, फोटो काढले गेले, जाहिराती करत सरकारच्या संवेदनशीलतेचा गाजावाजा सुरू झाला.

\n

पण एका दिवसातच… pic.twitter.com/arQzhX8uad

\n

— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) June 12, 2026

\n


\n‘दलिंदर सरकार’ म्हणत हर्षवर्धन सपकाळांची टीका   (Latur News )

\n

तर हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट करत या सरकारला “दलिंदर सरकार” म्हणतो ते उगाच नाही, अशा शब्दात हल्लाबोल केला आहे. “बैल मेल्यामुळे पत्नीला नांगराला जुंपण्याची वेळ आली… हा व्हिडिओ व्हायरल झाला, मग सरकार जागं झालं. मदतीसाठी एक बैल देण्यात आला… कॅमेरे आले, फोटो काढले गेले, जाहिराती करत सरकारच्या संवेदनशीलतेचा गाजावाजा सुरू झाला. पण एका दिवसातच तो बैल निकृष्ट निघाला आणि शेतातच कोसळला! ही मदत होती की बळीराजाच्या दुःखाची थट्टा?”, असा थेट सवाल सपकाळ यांनी राज्य सरकारला केला आहे.

\n

“एका बाजूला हजारो कोटींच्या घोषणा, जाहिराती आणि इव्हेंटबाजी… तर दुसऱ्या बाजूला संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला ढोंगी मदतीच्या नावाखाली निकृष्ट बैल दिला जातो. शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यापेक्षा त्याच्या वेदनांवर स्वतःची PR मोहीम उभे करणारे हे दलिंदर सरकार आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. Latur News

\n

हेही वाचा: 

\n

Tukaram Mundhe : निर्भीड अधिकारी! जीवे मारु असं धमकावणाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा ‘दबंग’ स्टाइल इशारा थेट म्हणाले…

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Latur News : “मदत होती की बळीराजाच्या दुःखाची थट्टा?”; शेतकऱ्याला दिलेला बैल आजारी निघाल्याने सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/Latur-News.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/was-this-aid-or-a-mockery-of-the-farmers-plight-sapkal-lashes-out-at-the-government-after-the-bull-provided-to-a-latur-farmer-turned-out-to-be-sick#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/Latur-News.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/was-this-aid-or-a-mockery-of-the-farmers-plight-sapkal-lashes-out-at-the-government-after-the-bull-provided-to-a-latur-farmer-turned-out-to-be-sick#webpage","name":"Latur News : “मदत होती की बळीराजाच्या दुःखाची थट्टा?”; शेतकऱ्याला दिलेला बैल आजारी निघाल्याने सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल","url":"https://www.dainikprabhat.com/was-this-aid-or-a-mockery-of-the-farmers-plight-sapkal-lashes-out-at-the-government-after-the-bull-provided-to-a-latur-farmer-turned-out-to-be-sick","inLanguage":"mr","description":"Latur News: रोहित पवारांनी देखील ट्वीट करत सरकारला सुनावले खडेबोल ","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/was-this-aid-or-a-mockery-of-the-farmers-plight-sapkal-lashes-out-at-the-government-after-the-bull-provided-to-a-latur-farmer-turned-out-to-be-sick#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/Latur-News.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/was-this-aid-or-a-mockery-of-the-farmers-plight-sapkal-lashes-out-at-the-government-after-the-bull-provided-to-a-latur-farmer-turned-out-to-be-sick#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/was-this-aid-or-a-mockery-of-the-farmers-plight-sapkal-lashes-out-at-the-government-after-the-bull-provided-to-a-latur-farmer-turned-out-to-be-sick","name":"Latur News : “मदत होती की बळीराजाच्या दुःखाची थट्टा?”; शेतकऱ्याला दिलेला बैल आजारी निघाल्याने सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल"}}]}}}

Latur News : “मदत होती की बळीराजाच्या दुःखाची थट्टा?”; शेतकऱ्याला दिलेला बैल आजारी निघाल्याने सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

Latur News : “मदत होती की बळीराजाच्या दुःखाची थट्टा?”; शेतकऱ्याला दिलेला बैल आजारी निघाल्याने सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल - Dainik Prabhat