सुमोना चक्रवर्तीला कपिल शर्मा शोमधून बाहेर काढले होते? अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

Sumona Chakravarti| अभिनेत्री आणि कॉमेडियन सुमोना चक्रवर्तीला कपिल शर्मा या शोमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये तिने कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारली होती. मात्र तिने हा शो सोडला. यानंतर सुमोनाला शोमधून काढून टाकण्यात आले, ती कपिलवर नाराज होती, अशा अफवाही पसरल्या होत्या. यावर सुमोनाने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
कपिल शर्मा शोबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुमोना म्हणाली की, “हे फार विचित्र आहे, कारण काही दिवसांपूर्वी एक चांगला लेख आला होता. मी पत्रकाराशी बोलले होते आणि त्याला नेमकं उलटं सांगितलं होतं. यानंतर दोन दिवसांनी आणखी एका पब्लिकेशनने मी सांगितलं त्याच्या उलट लेख छापण्याचा निर्णय घेतला. मी रोमानियात असल्याने मला त्याच्यावर काही बोलायचे नव्हते.”
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, “मी गेल्या वर्षी जुलैमध्ये संपलेल्या शोचा भाग होते आणि मी बाहेर पडले किंवा मला काढून टाकले, असे काही नाही. जुलैमध्ये शो संपला आणि त्यानंतर आम्ही सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झालो. त्यानंतर आम्ही आमचे वैयक्तिक प्रोजेक्ट हाती घेतले. सध्या मी ‘खतरों के खिलाडी’ करत आहे. कपिलने दुसरा शो केला. मी कपिलशी नाराज असण्याचे काहीच कारण नाही, त्याने आणि मी आधी काम केलं आहे ,” असे तिने सांगत चर्चांना पूर्णविराम दिला. Sumona Chakravarti|
दरम्यान, सुमोना 27 जुलै रोजी प्रीमियर होणाऱ्या ‘खतरों के खिलाडी 14’ या रिॲलिटी शोमध्ये दिसणार आहे. या शोसाठी ती देखील फार उत्सुक आहे. Sumona Chakravarti|
हेही वाचा:
सोने-चांदीच्या दरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बदल; जाणून घ्या नव्या किंमती





