Rohit Sharma : हिटमॅननं स्वत:हून वनडेचं कर्णधारपद सोडलं की हटवलं? अजित आगरकरने दिलं स्पष्टीकरण

Ajit Agarkar on Rohit Sharma’s ODI Captaincy : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय संघाची घोषणा आज झाली असून, या दौऱ्यात भारत तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने शुबमन गिलला एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे, तर रोहित शर्मा याची कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.
अजित आगरकर काय म्हणाले?
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा एकदिवसीय संघात फलंदाज म्हणून समावेश आहे, परंतु रोहितला कर्णधारपद न देण्याच्या निर्णयामुळे त्याच्या कारकिर्दीबाबत बीसीसीआयने स्पष्ट संकेत दिल्याचे मानले जात आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांसाठी वेगवेगळे कर्णधार निवडणे व्यावहारिक नाही. एकदिवसीय क्रिकेट कमी खेळले जाते, त्यामुळे सध्याचे लक्ष टी-20 विश्वचषकावर आहे. तसेच, शुबमन गिलला नेतृत्व सावरण्यासाठी वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याची शक्यता अधिक –
🚨 India’s squad for Tour of Australia announced
Shubman Gill named #TeamIndia Captain for ODIs
The #AUSvIND bilateral series comprises three ODIs and five T20Is against Australia in October-November pic.twitter.com/l3I2LA1dBJ
— BCCI (@BCCI) October 4, 2025
अजित आगरकर यांनी पुढे सांगितले की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी संघात स्थान मिळवण्यासाठी सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्या आहेत. निवडलेल्या खेळाडूंची नावे सेंटर ऑफ एक्सिलेंसकडे पाठवली जातात, जिथे त्यांच्या तंदुरुस्तीची चाचणी केली जाते. रोहित शर्माने स्वत: कर्णधारपद सोडले की त्याला हटवण्यात आले, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, आगरकर यांच्या विधानावरून त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याची शक्यता अधिक बळावली आहे.
हेही वाचा – IND vs WI : जड्डूचा ऐतिहासिक पराक्रम! अनिल कुंबळेला मागे टाकत बनला ‘किंग ऑफ द होम’
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय वनडे संघ:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.





