पाकमध्ये सोशल मीडियावरून अपप्रचार करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
Updated On:

इस्लामाबाद – पाकिस्तानात सरकारच्याविरोधात सोशल मीडियावरून होणारा अपप्रचार रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
तुरुंगात डांबलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाला राज्यविरोधी कारवाया आणि प्रचार सोडून देण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
तसेच मैत्री असलेल्या राष्ट्रांशी संबंध बिघडवणाऱ्यांवर आणि देशाचे नुकसान करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर राज्यविरोधी मोहीम चालवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा रविवारी कायदेशीर प्रकरणांचे प्रवक्ते अकील मलिक यांनी दिला आहे.





