वक्फ बोर्डाची कार्यप्रणाली पारदर्शक नाही : केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांची टीका

बिकानेर : वक्फ बोर्डाची कार्यप्रणाली पारदर्शक नाही. त्यांच्यामार्फत संपत्तीवर अतिक्रमण करण्यात येत आहे, हे काँग्रेसच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या सच्चर समितीचे म्हणणे आहे. मात्र सच्चर समितीने दिलेल्या अहवालावर काँग्रेसच्या वतीने कोणतेही काम करण्यात येत नाही. आज आम्ही त्यावर काम करत आहोत, त्याचा त्रास काँग्रेसला होत आहे, अशी टीका कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी केली.
एका कार्यक्रमासाठी ते बिकानेर येथे आले होते. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बांगलादेशातील स्थिती यावर देखील भाष्य केले. तत्पूर्वी मेघवाल यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने सच्चर समितीची स्थापना केली होती. सन २००६ साली सच्चर समितीच्या वतीने वक्फ बोर्डाच्या कार्यप्रणालीमध्ये पारदर्शकता नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यावर काँग्रेसकडून कोणतेही काम करण्यात आले नाही.
मात्र आता काँग्रेस त्यावरच टीका करत असल्याचे मेघवाल यांनी सांगितले. सध्या बांगलादेशमध्ये असलेल्या परिस्थितीवर देखील त्यांनी भाष्य केले. केंद्र सरकारच्या वाटेने १९ हजार भारतीय नागरिक, ९०० पेक्षा अधिक विद्यार्थी आणि अल्पसंख्याक हिंदू आणि त्यांच्या धर्मस्थळांवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगताना बांगलादेशात असलेल्या भारतीयांनी धीर धरावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.





