“वक्फ विधेयकाचा मुस्लिमांवर हल्ला, पण…”; राहुल गांधींचा पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi | लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ मंजूर झाले. संसदेच्या दोन्ही सभागृहात या विधेयकावरील चर्चा संपल्यानंतर, हे विधेयक मंजूर झाले आणि आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल. राष्ट्रपतींची मंजुरी मिळताच त्याचे कायद्यात रूपांतर होईल. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पहाटे २.३० वाजता राज्यसभेत मतदान झाले आणि विधेयकाच्या बाजूने एकूण १२८ मते पडली तेव्हा सभागृहात उपस्थित असलेल्या समर्थक खासदारांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या.
दरम्यान, हे सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंग्रजी दैनिकाने दिलेले वृत्त एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहे. वक्फ बिलाबद्दल मांडलेल्या भूमिकेचा उल्लेख करत राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. तसेच त्यांनी हा कायदा मुस्लिमांना लक्ष्य करीत आहे, परंतु भविष्यात उर्वरित समुदायांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असे सांगितले आहे. Rahul Gandhi |
द टेलिग्राफने आरएसएसशी संबंधित ऑर्गनायझरमधील एका लेखाचा हवाला देत वृत्त दिले आहे. ऑर्गनायझरमध्ये ‘कॅथलिक चर्च की वक्फ बोर्ड, भारतात कुणाकडे सर्वाधिक जमीन’, असा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखात कॅथलिक चर्चकडे ७ कोटी हेक्टर जमीन असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकावरून केंद्र सरकारसह आरएसएसवर निशाणा साधला आहे. Rahul Gandhi |
राहुल गांधींचे ट्वीट
राहुल गांधींनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी म्हणालो होतो की, वक्फ विधेयक आता मुस्लिमांवर हल्ला करत आहे. पण, त्याचबरोबर भविष्यात इतर समुदायांना लक्ष्य करण्यासाठी ते एक पायंडा पाडत आहे. आरएसएसची नजर ख्रिश्चनांकडे जाण्यास फार वेळ लागला नाही. संविधान ही एकमेव ढाल आहे जी आपल्याला अशा हल्ल्यांपासून वाचवते. मात्र त्याचे रक्षक करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे”, असे भाष्य राहुल गांधींनी केले आहे. Rahul Gandhi |
हेही वाचा:





