Mohammad Hafeez : ‘९० के दशक का लौंडा…’, मोहम्मद हाफिजच्या टीकेला वकार युनूसने पोस्ट शेअर करुन दिले चोख प्रत्युत्तर

Waqar Younis hits back at Mohammad Hafeezs : पाकिस्तानमध्ये खेळाडूंविरुद्ध आरोप-प्रत्यारोप हे काही नवीन नाही. अनेकदा खेळाडू टीव्ही किंवा सोशल मीडियाद्वारे एकमेकांवर उपहासात्मक टिप्पणी करत राहतात. आजकाल दोन माजी पाकिस्तानी खेळाडू समोरासमोर आहेत. वसीम अक्रम आणि वकार युनूस यांच्या काळात पाकिस्तानने आयसीसीची कोणतीही स्पर्धा जिंकली नाही हे त्याचे कारण आहे. मोहम्मद हाफिजने एका टीव्ही शोमध्ये वसीम अक्रम आणि वकार युनूससह अनेक दिग्गजांच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता वकार युनूसने सोशल मीडियावर यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मोहम्मद हाफिज काय म्हणाला होता?
पीटीव्ही स्पोर्ट्सवर बोलताना हाफिज म्हणाला होता की, ‘मी ९० च्या दशकात खेळणाऱ्या खेळाडूंचा चाहता आहे. पण जेव्हा संघाला आयसीसी स्पर्धा जिंकवून देण्याचा विचार येतो, तेव्हा त्यांनी एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. ते १९९६, १९९९ आणि २००३ चे विश्वचषकात हरले. आम्ही १९९९ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलो. पण वाईटरित्या हरलो. ते स्टार्सप्रमाणे एक मोठे मेगास्टार होते. पण ते आयसीसी स्पर्धा जिंकून आम्हाला प्रेरणा देऊ शकले नाहीत.’
२०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानसाठी प्रेरणादायी –
तो पुढे म्हणाला की, ‘२००९ मध्ये आम्ही युनूस खानच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक जिंकला, त्यानंतर २०१७ मध्ये आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, जी पाकिस्तानसाठी प्रेरणादायी आहे.’ आता वकार युनूसने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून मोहम्मद हाफीजच्या या कमेंट्सना उत्तर दिले आहे. त्याने त्याच्या आणि वसीम अक्रमच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारी एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये लिहिले, ‘९० के दशक का लौंडा’ लिहिले आणि वसीम अक्रम आणि स्वतःच्या एकूण आकडेवारीवर प्रकाश टाकला.
https://twitter.com/waqyounis99/status/1897682319898820745
वसीम आणि वकारची कामगिरी –
वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी मिळून पाकिस्तानसाठी १९१ कसोटी आणि ६१८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात दोघांनीही १७०५ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पाकिस्तानची मोहीम संपली आहे. पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही. याशिवाय, तो ग्रुप अ मधून बाहेर पडणारा पहिला संघ होता.





