अमेरिकेच्या टॅरिफवॉर दरम्यान चीनचा भारतापुढे मैत्रीचा हात ; परराष्ट्र मंत्री वांग यी अजित डोवाल यांची भेट घेणार

Wang Yi India Visit। अमेरिकेच्या टॅरिफनंतर गेल्या काही दिवसांपासून भारताच्या परराष्ट्र धोरणात बदल दिसून येत आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी पुढील आठवड्यात भारताला भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेणार आहेत. त्यांचा हा दौरा आंतरराष्ट्रीय राजनैतिकतेतील बदलाचे एक मोठे संकेत आहे. पुढील आठवड्यात चीनचे परराष्ट्र मंत्री भारताला भेट देतील, तर एस जयशंकर २१ ऑगस्ट रोजी रशियाला भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
चीन-भारत एकत्र येणे अमेरिकेसाठी चिंतेची बाब Wang Yi India Visit।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने रशियाकडून कच्चे तेल घेणे थांबवावे असे वाटते. यावर भारताने दिलेल्या चोख उत्तरानंतर अमेरिकेने पाकिस्तानला आपल्या शेजारी बसवले. अशा परिस्थितीत चीन आणि भारतासारख्या दोन मोठ्या शक्तींचे एकत्र येणे ही अमेरिकेसाठी चिंतेची बाब आहे. भारत रशिया आणि चीनशी संबंध मजबूत करण्यात गुंतलेला आहे. अशा परिस्थितीत पुढील आठवड्यात दिल्लीतून मोठा निर्णय येऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
पंतप्रधान मोदी एससीओ परिषदेत चीनला जाणार Wang Yi India Visit।
२०२० मध्ये लडाखमधील गलवान याठिकाणी भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये कटुता दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनलाही भेट देणार आहेत. यावेळी रशियाही तेथे उपस्थित राहणार आहे. चीन ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान तियानजिनमध्ये एससीओ शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे आणि म्हणूनच चीनसोबतचे संबंध सामान्य झाल्यामुळे अमेरिका तणावात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून २०१८ मध्ये एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी शेवटचा चीनचा दौरा केला होता. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग ऑक्टोबर २०१९ मध्ये दुसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी भारताला भेट दिली होती.
ट्रम्पने भारतावर २५ टक्के अतिरिक्त कर लादल्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित डोवाल यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. यादरम्यान प्रादेशिक सुरक्षा, संरक्षण सहकार्य आणि आगामी नेतृत्वस्तरीय बैठकीच्या तयारीवर चर्चा झाली. गेल्या आठवड्यात एनएसए अजित डोवाल म्हणाले की पुतिन लवकरच भारताला भेट देतील.





