Wai MIDC Fire: वाई एमआयडीसीत अग्नितांडव! गौरी- गणपती मूर्ती कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी
Wai MIDC Fire: पाच अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

सचिन इथापे
भुईंज : वाई एमआयडीसी परिसरातील बावळेश्वर गौरी-गणपती मूर्ती कारखान्याला आज मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केल्याने कारखान्यात तयार करून ठेवलेल्या गौरी- गणपतीच्या मूर्ती तसेच इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या आगीत कारखान्यातील गौरी-गणपतीच्या मूर्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नुकसानीचा नेमका आकडा आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या भीषण दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून, अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर परिस्थिती नियंत्रणात येण्याची अपेक्षा आहे.
यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आग पुर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर नुकसानीचा नेमका अंदाज स्पष्ट होणार आहे.
Satara: महावितरणच्या बारामती परिमंडळातील कारभाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी





