Wagholi News : पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी वाघोली (Wagholi News) येथे वाघेश्वराचे दर्शन घेतले. वाघोली येथील ऐतिहासिक श्री वाघेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास उपस्थिती दर्शवत श्री महादेवांचे मनोभावे दर्शन घेऊन वाघोलीसह संपूर्ण पुण्याच्या शाश्वत विकासासाठी व सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रार्थना केली. मंदिर विश्वस्त व स्थानिक नागरिकांशी विकासाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. भारतीय जनता पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींच्या एकजुटीने वाघोलीच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलू, असा विश्वास नागपुरे यांनी व्यक्त केला. या प्रसंगी नगरसेविका ऐश्वर्या पठारे, नगरसेवक रामदास दाभाडे, नगरसेवक अनिल सातव, नगरसेवक शैलजीत बनसोडे, नगरसेविका रत्नमाला संदीप सातव, नगरसेविका डॉ. श्रेयस खांदवे, माजी नगरसेविका श्वेता गलांडे, वाघोलीच्या माजी सरपंच जयश्रीताई सातव,पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस संदीप सातव, मीना सातव, संजय सातव अन्य पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. वाघोलीच्या विकासात पुण्याच्या महापौर, आणि नगरसेवकांबरोबर प्रशासन, ग्रामस्थ यांचे योगदान मोलाचे ठरणार आहे. वाघोली लवकरच प्रगतीपथावर येईल असा विश्वास वाटतो. राजेंद्र सातव पाटील अध्यक्ष, वाघेश्वर देवस्थान वाघोली