Wagholi News : शिरसवडीत भाजपचा डंका! सुप्रिया गोते सरपंचपदी ‘बिनविरोध’; पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव

प्रभात वृत्तसेवा
वाघोली – पूर्व हवेलीतील प्रतिष्ठित समजल्या जाणार्या शिरसवडी येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुप्रिया शिवाजीराव गोते यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या निवडीबद्दल पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.भाजपच्या हवेली तालुका महिला अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज केले होते. ग्रामपंचायतमध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता.
शिरसवडी ग्रामपंचायत सरपंच पदी सुप्रिया गोते यांची बिनविरोध निवड झाल्याने महिला वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गणेश कुटे यांच्या हस्ते पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने नवनियुक्त सरपंच गोते यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध गावचे सरपंच उपसरपंच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
गावाचा सर्वांगीण विकास आजी-माजी पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या साथीने करणार असल्याचे सुप्रिया गोते यांनी सांगितले. सुप्रिया गोते यांच्या निवडीबद्दल माजी उपसरपंच संजय भोरडे, शिवाजी भोर, बापूसाहेब भोर, बाळासाहेब गावडे, अशोक सेवा सहकारी संस्थेचे माजी चेअरमन प्रमोद गावडे, अमोल पायगुडे आदींनी अभिनंदन केले आहे.





