Wagholi News: महिला शक्तीचा जागर! ८०० रणरागिनींनी गाजवलं क्रिकेटचं मैदान; पाहा कोण ठरलं विजेते?

प्रभात वृत्तसेवा
वाघोली – वाघोली-खराडी वूमन्स प्रीमियर लीग सीझन 2 ही भव्य महिला क्रिकेट स्पर्धा प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. महिलांच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणार्या या स्पर्धेत तब्बल 60 संघांनी सहभाग घेतला असून 800 पेक्षा अधिक महिला खेळाडूंनी आपल्या क्रिकेट कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. त्यामुळे वाघोली-खराडी परिसरात ही स्पर्धा विशेष चर्चेचा विषय ठरली.
स्पर्धेतील सामने अत्यंत चुरशीचे ठरले. प्रत्येक संघाने उत्कृष्ट खेळ, संघभावना, जिद्द आणि क्रीडावृत्तीचे दर्शन घडवत प्रेक्षकांची मने जिंकली. अंतिम सामना तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरला.स्पर्धेत सहभागी सर्व संघ, खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक आणि टीम मॅनेजमेंट यांचे आयोजक व मान्यवरांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना आयोजक संदीप (आबा) सातव यांनी, ज्या संघांना यंदा यश मिळाले नाही, त्यांच्यासाठीही हा अनुभव प्रेरणादायी ठरेल.
भविष्यात ते निश्चितच मोठे यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, बक्षीस वितरण सोहळ्यास भाजप पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद, नविनजी नायडू, नगरसेवक किरण दादा दगडे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा निवेदिता ताई एकबोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच कनिका पांडा, दत्ता ढवळे, मोनिका खेरा, समीक्षा मिश्रा, संदीप बंडी, राहुल पाटील, सीमा तनवर आणि शुभ्रा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.
स्पर्धेतील विजेते संघ
प्रथम : उत्सव स्पार्टन, द्वितीय : ऑर्किड स्टोर्मस, तृतीय : निआ पलटण, चतुर्थ : टायटनयासोबतच वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी करणार्या महिला खेळाडूंना विशेष पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. विजेत्यांना ट्रॉफींसह सायकल्स देऊन गौरविण्यात आले. मालिकेची मानकरी : शिल्पा करके, उत्कृष्ट फलंदाज : स्नेहल शेट्टी, उत्कृष्ट गोलंदाज: तेजस्वी भोसुरेया खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
“वाघोली-खराडी वूमन्स प्रीमियर लीग सीझन 2 ने महिला क्रिकेटला नवी ओळख मिळवून दिली आहे. महिलांचा आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि क्रीडासंस्कृती अधिक बळकट करणारा हा उपक्रम ठरला आहे.”
– प्रदीप कंद, जिल्हाध्यक्ष, भाजप पुणे जिल्हा





