वाघोली : हॉटेल समोर मोटरसायकल पार्क करण्याच्या कारणावरून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत एका तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दिनेश शंकर गाढवे, योगेश शंकर गाढवे, शंकर गाढवे (सर्व रा. रायसोनी कॉलेज वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचा भाऊ हे रायसोनी कॉलेज जवळ एक खानावळ चालवत आहेत. हॉटेल समोर दोन-तीन कस्टमर ने मोटरसायकली पार्क केल्या होत्या. या कारणास्तव त्यांच्या ओळखीचा दिनेश गाढवे याने त्याच्या ताब्यातील स्विफ्ट कार घेऊन हॉटेल समोर थांबवून मोठ मोठ्याने आरडा ओरडा केला. तसेच फिर्यादी व त्याच्या भावास शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. याशिवाय योगेश शंकर गाढवे याने लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. शंकर गाढवे याने धमकी दिल्या प्रकरणी वाघोली पोलिसांनी मारहाण केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. भावी दादांवर कारवाईसाठी पोलीस ऍक्शन मोडवर … वाघोली पोलीस अंतर्गत शिक्षणासाठी बाहेर जिल्ह्यातील राज्यातील शिक्षण घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. काम करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची दहशत कोणी निर्माण करू नये, यासाठी भावी दादा बनणाऱ्यांची पोलिसांनी कारवाई करून दादागिरी काढण्यास सुरुवात केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांप्रती विश्वास, आदर वाढू लागला आहे.