खराडी येथील फार्मसी महाविद्यालयांमध्ये मतदान जनजागृती अभियान कार्यक्रम संपन्न

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या खराडी येथील शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मासिटिकल सायन्सेस आणि रिसर्च सेंटर या महाविद्यालयामध्ये शनिवार दिनांक 26 ऑक्टोबर 2024 रोजी मतदान जनजागृती अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदरच्या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर अशोक भोसले, उपप्राचार्य डॉक्टर विजया बर्गे तसेच पदविका विभागाचे डॉक्टर अश्विनी शेवाळे, डॉक्टर सुजित काकडे इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक भोसले यांनी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे असे सांगून विद्यार्थ्यांनी आपले मित्र परिवार, नातेवाईक आणि आपल्या परिसरातील संबंधित पात्र असलेल्या नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे असे संबोधित केले.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान 100% कसे होईल यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे असेही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक भोसले यांनी संबोधित केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री जितेंद्र शिंदे यांनी मतदान जनजागृतीची शपथ दिली.
सदरच्या मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील प्राध्यापिका आणि राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख सौ.भाग्यश्री शेलार, श्री. नितीन नेहरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पदविका विभागाच्या डॉक्टर अश्विनी शेवाळे यांनी केले.





