nagar | वाचनालयाकडून संकल्प पत्र भरून मतदान जागृती

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- श्रीरामपूर नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक वाचनालयाच्यावतीने वाचक व नागरिकांकडून मतदान संकल्प पत्र भरून मतदानाची जनजागृती करण्यात आली. श्रीरामपूर नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक वाचनालयच्यावतीने मतदान जनजागृती व ७५ % टक्क्यांपेक्षा अधिक मतदानासाठी लोकशाहीचे पुस्तक उपक्रम मिशन अमृत उपक्रम राबविण्यात आला.
यानिमित्ताने लोकमान्य टिळक वाचनालय येथे आलेले वाचक व नागरिकांकडून मतदान संकल्प पत्र भरून मतदानाची जनजागृती करण्यात आली होती. या उपक्रमाचे आयोजन प्रांताधिकारी तसेच नगरपालिकेचे प्रशासक अधिकारी किरण सावंत पाटील व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
यावेळी ग्रंथपाल स्वाती पुरे, सम्यक धुसा, प्रभाकर जाधव, मिलिंद आडांगळे, रवींद्र काळे, बाळासाहेब बडे, गोरख दौडे, गणेश प्रधान ,पार्थ नामले, संजय प्रधान,कोमल चौथे, साक्षी आहिरे आदींसह नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.





