Satara News : हेळवाकमध्ये सभागृह व अभ्यासिकेचे लोकार्पण
हेळवाकच्या बौद्ध विकास मंडळाच्या (कोयना विभाग) अधिपत्याखाली (Satara News) असणाऱ्या सामाजिक सभागृह व अभ्यासिकेचे लोकार्पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात पार पडले.

Satara News : हेळवाकच्या बौद्ध विकास मंडळाच्या (कोयना विभाग) अधिपत्याखाली (Satara News) असणाऱ्या सामाजिक सभागृह व अभ्यासिकेचे लोकार्पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात पार पडले.
पाटण पंचायत समितीच्या (Satara News) सभापती सविता पवार व उपसभापती विजय पवार यांच्या हस्ते या सभागृह व अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरपंच गजानन कदम यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी पंचायत समिती सदस्या मंगल माने, विद्या शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, उपजिल्हाप्रमुख सावळाराम लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी अशा सुविधा अत्यंत गरजेच्या असल्याचे सभापती सविता पवार यांनी नमूद केले. सामाजिक सभागृह व अभ्यासिकेमुळे नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार असून शिक्षण आणि सामाजिक एकोप्याला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पामुळे (Satara News) हेळवाक परिसरात सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक उपक्रमांना चालना मिळणार असून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे सुसज्ज व शांत वातावरण उपलब्ध होणार आहे.यावेळी दीपक कदम, प्रदीप कदम, सुनील कदम, सुधीर कारंडे, सखाराम कदम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
कामांची गती कायम राहणार…
शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांनी सांगितले की, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली कोयना परिसराच्या विकासाला नवे बळ मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेत केवळ घोषणांपुरते न राहता प्रत्यक्षात विकासकामे राबविण्याचा धडाका सुरू आहे.
हेळवाकमधील सामाजिक सभागृह व अभ्यासिका ही त्याच विकासदृष्टीची झलक असून ग्रामीण भागाला सक्षम करण्याचा हा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या काळात कोयना परिसराला पर्यटन व विकासाच्या नकाशावर अग्रस्थानी नेण्यासाठी अशीच कामांची गती कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






