पुणे बार असोसिएशनच्या निवडणूकीसाठी बुधवारी मतदान व मतमोजणी

पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणूकीसाठी उद्या (बुधवार दि.३१) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. ईव्हीएम मशिनवर मतदान होणार आहे. मतदानानंतर मतमोजणी होऊन रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
सुमारे ७ हजार ८०० वकील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अध्यक्षपदासाठी दुहेरी निवडणूक होत आहे. अॅड. अमित गिरमे आणि अॅड. संतोष खामकर यांच्यात ही निवडणूक होणार आहे. तर उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी मोठी चुरस आहे. तब्बल सात जण नशिब अजमावत आहेत. त्यामध्ये अॅड. समीर भुंडे, अॅड. शिरीषकुमार देशमुख, अॅड. अमेय देशपांडे, अॅड. पवन कुलकर्णी, अॅड. संजय पाटणकर, अॅड. कुमार पायगुडे, अॅड. मयुर साळुंके यांचा समावेश आहे. तर सचिव पदांच्या दोन जागांसाठीची लढत सहा जणामध्ये होत आहे.
अॅड. चेतन हरपळे, अॅड. अभिषेक जगताप, अॅड. मकरंद मते, अॅड. प्रभाकर सोनवणे, अॅड. अरविंद तायडे, अॅड. गणेश थरकुडे हे निवडणूक रिंगणात अहेत. तर, खजिनदार पदी अॅड. प्रदीप चांदेरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ऑडीटर पदासाठी अॅड. श्रध्दा कदम, अॅड. अजिंक्य खैरे, अॅड. केदार शितोळे यांच्यात निवडणूक होणार आहे.
दहा कार्यकारिणी सदस्यांची सर्वानुमते निवड झाली आहे. त्यामध्ये, अॅड. अजिंक्य महाडिक, अॅड. तेजवंती कपले, अॅड. आदित्य खांदवे, अॅड. शाहीन पठाण, अॅड. सोमनाथ पोटफोडे, अॅड. रोहित गुजर, अॅड. अक्षय शितोळे, अॅड. सुरज शिंदे, अॅड. स्वप्निल चांधेरे, अॅड. अंजली बांदल यांची सर्वानुमते निवड झाली आहे. निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. दादाभाऊ शेटे काम पाहत आहेत. तर अॅड. कल्याण शिंदे आणि अॅड. योगेश देशमुख उपनिवडणूक अधिकारी आहेत.




