Satara News : साताऱ्यात मतदान करताना हार्ट अटॅक आल्याने मतदाराचा जागीच मृत्यू

सातारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी आज संपूर्ण राज्यात मतदान पार पडत आहे. महायुती,महाविकास आघाडी आणि इतर पक्षांच्या एकूण 4136 उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.यादरम्यान साताऱ्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये मतदान करताना हार्ट अटॅक आल्याने मतदाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
कुठे घडली घटना?
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील मोरवे गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. शाम धायगुडे असे मृत्यू झालेल्या मतदाराचे नाव आहे. ते 67 वर्षाचे होते. मतदान करताना शाम धायगुडे यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसारत हळहळ व्यक्त केली जात आहे.
या मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी नागरांकिचा मतदानासाठी चांगला प्रतिसाद असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तरुणांसह महिला वयोवृद्ध नागरिक देखील मोठ्या संख्येनं मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत.





