“डोनाल्ड ट्रम्पनी योग्य काम केलं’ ; अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५०% टॅरिफवर झेलेन्स्की यांचे मोठे विधान

volodymyr zelensky। भारत आणि अमेरिका यांच्यात तणावाची परिस्थिती अजूनही कायम आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५० टक्के कर लादला आहे. यासाठी त्यांना त्यांच्याच देशात टीका सहन करावी लागली आहे, परंतु दरम्यानच्या काळात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलडोमीर झेलेन्स्की यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. झेलेन्स्की यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफचे समर्थन केले आहे. यावेळी त्यांनी रशियाचाही उल्लेख केला. युक्रेन आणि रशियामध्ये अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे, जे अद्याप थांबलेले नाही.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात एका अमेरिकन पत्रकाराने झेलेन्स्कीशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीचा उल्लेख केला. हे तिघे चीनमधील एससीओ शिखर परिषदेदरम्यान भेटले. अमेरिकन पत्रकाराने ट्रम्पच्या टॅरिफ योजनेचा उलट परिणाम झाला आहे का? असा प्रश्न विचारला. याला उत्तर देताना झेलेन्स्की म्हणाले, “रशियाशी व्यवहार करणाऱ्या देशांवर कर लादणे पूर्णपणे योग्य आहे.”असे म्हणत त्यांनी ट्रम्पच्या निर्णयाला समर्थन देत एक प्रकारे भारताच्या विरुद्ध भूमिका मांडली आहे.
मोदी, पुतिन आणि जिनपिंग यांच्या भेटीनंतर गोंधळ volodymyr zelensky।
पंतप्रधान मोदी अलीकडेच एससीओ शिखर परिषदेसाठी चीनला गेले होते. या काळात त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी विशेष भेट घेतली. त्यांनी जिनपिंग यांचीही भेट घेतली. या तिघांचा फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. जर हे तिन्ही देश एकत्र आले तर एक नवीन जागतिक शक्ती उदयास येईल असे मानले जाते.
रशियाकडून तेल खरेदी करण्याची किंमत भारत मोजतोय
ट्रम्प यांनी यापूर्वी भारतावर २५ टक्के कर लादला होता, परंतु त्यानंतर २५ टक्के अतिरिक्त कर लादण्यात आला. अशाप्रकारे, आता एकूण कर ५० टक्के झाला आहे. ट्रम्प यांनी भारताला रशियाकडून तेल खरेदी करू नये असे सांगितले होते. ट्रम्प म्हणतात की रशिया आपले उत्पन्न युद्धात गुंतवत आहे. भारतही आपल्या मुद्द्यावर ठाम राहिला. म्हणूनच त्यावर जास्त कर लादण्यात आला आहे.
युक्रेन-रशिया युद्धावर तोडगा नाही volodymyr zelensky।
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अनेक महिन्यांपासून सुरू आहे, जे अद्याप थांबलेले नाही. जगातील अनेक मोठ्या नेत्यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन आणि झेलेन्स्की यांच्याशी बैठक केली होती, तरीही अद्याप तोडगा निघालेला नाही.





