Eknath Shinde : “डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफ वाढीला चोख प्रत्युत्तर” – एकनाथ शिंदे

Donald Trump | Eknath Shinde – राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टॅरिफ लावलेलं आहे, त्यामुळे त्यांनाच नुकसान होणार आहे. कारण भारत ट्रम्प टॅरिफमुळे आत्मनिर्भरतेकडे जात आहे. जीएसटीच्या निर्णयामुळे भारत सक्षमतेकडे वाटचाल करत ट्रम्पच्या टॅरिफला नरेंद्र मोदी यांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचे दिसून येत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मोदी सरकारने 21 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत जीएसटीचे दोन स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बुधवारी (3 ऑगस्ट) जीएसटी परिषदेची 56 वी बैठक नवी दिल्लीत पार पडली.
या बैठकीमध्ये 22 सप्टेंबर 2025 पासून हे बदल लागू करण्यासंदर्भात शिक्कामोर्तब करण्यात आले. यावरून एकनाथ शिंदे यांनी विरोधकांसह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधक या जीएसटी केलेल्या स्लॅबचा फायदा घेणार आहेत. त्यामुळे टीका करताना विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे अभिनंदन करावे लागेल. पण खऱ्या अर्थाने या संपूर्ण देशवासियांची दिवाळी गोड आणि आनंदी करण्याचे काम त्यांनी केले आहे.
आता जे स्लॅब होते, 5, 12, 18 आणि 28 आता फक्त 5 आणि 18 हे दोनचं स्लॅब राहणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य माणसाला मोठा फायदा होईल आणि खऱ्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदी यांनी आपली जी अर्थव्यवस्था आहे, तिला सक्षम करण्याचे काम केले आहे. तसेच आपली जी अर्थव्यवस्था आहे, तिला 11 व्या नंबरवरून तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे जे मोदींचे स्वप्न आहे, ते पूर्ण होईल आणि देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचे या निर्णयामुळे दिसून येत आहे, असेही शिंदे म्हणाले.





