‘जॉली Vs जॉली! ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटाचा मजेशीर टीझर रिलीज

Jolly LLB3 Teaser | ‘जॉली एलएलबी ३‘ चित्रपटाची घोषणा करण्यात आल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘जॉली एलएलबी’ आणि ‘जॉली एलएलबी २’ असे या चित्रपटाचे दोन्ही भाग सुपरहिट ठरले होते. पहिल्या भागात अर्शद वारसीने तर दुसऱ्या भागात अक्षय कुमारने काम केलं आहे. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात दोन्ही कलाकार एकत्र दिसणार आहेत.
नुकताच ‘जॉली एलएलबी ३’ सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तिसऱ्या भागात हे दोन्ही स्टार्स कोर्टात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यावेळी कोर्टरूममध्ये केस तर लढला जाईल, पण त्याचबरोबर त्यांच्यातील भांडणंही पाहायला मिळणार आहेत, ज्याची झलक टीझरमध्ये दिसून आली आहे. अक्षय कुमार, अर्शद वारसी, सौरभ शुक्ला यांच्या धमाल अभिनयाची जुगलबंदी सर्वांना खळखळून हसवत आहे. Jolly LLB3 Teaser |
Pehli baar courtroom mein do do Jolly, ab hoga comedy, chaos aur क्लेश! #JollyLLB3Teaser out now: https://t.co/WdSwNdszz2 #JollyVsJolly#JollyLLB3 in cinemas 19th September. pic.twitter.com/hMTgDCjHCC
— Jolly Mishra – Asli Jolly from Kanpur (@akshaykumar) August 12, 2025
‘जॉली एलएलबी ३’ चा केवळ टीझरच रिलीज झाला नाही, तर त्याची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे .हा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे. जॉली एलएलबी ३’चं दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलं आहे. ‘जॉली एलएलबी’ चे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे हा तिसरा भागाकडून देखील प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. Jolly LLB3 Teaser |
हेही वाचा :
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह आशिया कप 2025 खेळणार की नाही? मोठी अपडेट समोर





