Shikrapur | निसर्ग वन्यजीव संस्थेच्या कार्याचा गौरव ; पुणे वनविभागाच्या वतीने सन्मान..

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – येथून पशू-पक्षांच्या रक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेने वन्यजीव संवर्धनासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन संस्थेला पुणे वनविभाग व वन्यजीव रक्षक संस्था मावळ यांच्या वतीने उत्कृष्ठ संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.शिक्रापूर (ता. शिरूर) येथून सुरू करण्यात आलेल्या निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेने आज पर्यंत अनेक साप निसर्गात मुक्त केले असून कित्येक बिबट बछडे, कोल्हे यांसह पशू-पक्षांना सोडण्यासाठी संवर्धनासाठी जनजागृती केली.
या कार्याची दखल घेत पुणे वनविभाग, वन्यजीव रक्षक संस्था मावळ, माझी वसुंधरा अभियान, रोटरी क्लब ऑफ गोल्डन यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे यांना उपमुख्यकार्यकारी अधिकारी ममता राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे, नगरसेवक संतोष दाभाडे, वन्यजीव रक्षक संस्था मावळचे संस्थापक निलेश गराडे व अध्यक्ष अनिल आंद्रे, सेवानिवृत्त वनाधिकारी संजय मारणे, नरेंद्र पाटील, राहुल काकडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, सचिव अमर गोडांबे, संचालक राहुल त्रिकुटे, अल्ताभ सय्यद, सर्पमित्र अमोल डाडर, आकाश पारडे, हेमंत परदेशी, नरेश बाविस्कर, अमोल कुसाळकर, शुभम वाघ, राहुल शेजवळ, आदिनाथ चव्हाण, बाळासाहेब मोरे, विष्णू हक्के, मनोज थोरात, हेमंत उगले, वैभव निकाळजे, नितीन शेलकर आदी उपस्थित होते. या सन्मानाबाबत बोलताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी केलेल्या कार्याचा गौरव झाल्याचा अभिमान वाटत असल्याचे निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे सचिव अमर गोडांबे व आकाश पारडे यांनी सांगितले.




