Vi चा धमाका! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सुरू केली 5G सेवा, ग्राहकांना मिळणार अनलिमिटेड इंटरनेटचा फायदा

Vodafone Idea Launches 5G Services | टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाने (VI) अखेर भारतात 5G सेवा सुरू केली आहे. जिओ आणि एअरटेलची 5जी सेवा उपलब्ध असल्याने व्हीआय हाय-स्पीड इंटरनेटच्या शर्यतीत मागे असल्याचे पाहायला मिळत होते. यामुळे कंपनीला ग्राहकांना देखील गमवावे लागले. मात्र, आता व्हीआयने मुंबईपासून 5G इंटरनेट सेवेला सुरुवात केली आहे.
कंपनी भारतात ग्राहक वाढवण्यासाठी व जिओ-एअरटेलला टक्कर देण्यासाठी प्रयत्न करत आहे. मुंबईपाठोपाठ देशातील इतर पाच शहरांमध्ये देखील कंपनी सेवा सुरू करणार आहे. कंपनी एप्रिलपर्यंत दिल्ली, बगंळुरू, चंदीगड, पटना आणि म्हैसूरमध्ये 5G सेवेचा विस्तार करणार आहे. पुढील टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि चेन्नई येथे सेवा सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे.
पुढील 3 वर्षांमध्ये 17 सर्कलमधील 100 शहरांमध्ये 5जी सेवा सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे. व्हीआयने 5जी सेवेची घोषणा केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये देखील वाढ दिसून आली आहे. एकाच दिवसात कंपनीच्या शेअर्सची किंमत 5 टक्क्यांनी वाढली आहे.
VI चे 5जी प्लॅन्स (VI 5G Prepaid Plans)
Vi च्या 5G प्रीपेड प्लॅन्सची किंमत 299 रुपयांपासून सुरु होते. यामध्ये 28 दिवसांसाठी दररोज 1जीबी डेटा मिळतो. कंपनीच्या सर्वात महागड्या 5जी प्रीपेड प्लॅनची किंमत 3,599 आहे. यामध्ये 365 दिवसांसाठी दररोज 2जीबी डेटा मिळतो. याशिवाय, कंपनीकडे 349 रुपये, 579 रुपये, 859 रुपये, 365 रुपये, 649 रुपये आणि 979 रुपये किंमतीचे 5जी प्रीपेड प्लॅन्स देखील आहेत.
याशिवाय, कंपनीने 451 रुपये, 551 रुपये, 751 रुपये आणि 1201 रुपये किंमतीसह येणारे पोस्टपेड प्लॅन्स देखील लाँच केले आहेत. यामध्ये अनलिमिटेड 5जी डेटाचा फायदा मिळेल.





