Best Mobile Recharge Plans | टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi कडे कमी किंमतीत येणारे अनेक शानदार रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. ट्रायच्या निर्देशानंतर कंपन्यांनी ग्राहकांसाठी केवळ कॉलिंगसह येणारे खास प्लॅन्स लाँच केले आहेत. या कंपन्यांकडे 84 दिवसांच्या मुदतीसह येणाऱ्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्सविषयी जाणून घेऊया. Jio चा सर्वात स्वस्त 84 दिवसांचा प्लॅन देशातील सर्वात मोठी टेलिकॉन कंपनी असलेल्या Jio कडे 448 रुपयांचा शानदार रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. यामध्ये 84 दिवसांची वैधता मिळते. जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 1000 एसएमएस मिळतात. तसेच JioTV आणि JioCloud चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळेल. या प्लॅनचा दररोजचा खर्च 5 रुपये आहे. Airtel चा 84 दिवसांचा प्लॅन Jio ला टक्कर देण्यासाठी Airtel चा 469 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांच्या मुदतीसह येतो. यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि 900 एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये डेटा यामध्ये उपलब्ध नाही. याशिवाय, Apollo 24|7 Circle आणि फ्री हॅलोट्यूनसचा फायदा मिळतो. या प्लॅनचा दररोजचा खर्च 5.58 रुपये आहे. Vi चा सर्वात स्वस्त 84 दिवसांचा प्लॅन Vi च्या 84 दिवसांच्या प्लॅनची किंमत 470 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग आणि 900 एसएमएसचा फायदा मिळेल. यामध्ये डेटाचा फायदा मिळत नाही. प्लॅनचा दररोजचा खर्च 6 रुपयांपेक्षा कमी आहे.