‘ट्रम्प असते तर हे संकट आले नसते’ ; युक्रेन युद्धावर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची कबुली

vladimir putin on Ukraine War। जर डोनाल्ड ट्रम्प यांचा २०२० मध्ये पराभव झाला नसता तर युक्रेन युद्ध टाळता आले असते, अशी कबुली रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली आहे. पुतिन यांनी माध्यमांशी संवाद साधताना, “फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला हा एक संकट होते जे ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली रोखता आले असते” असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कौतकाच वर्षाव केला.
व्लादिमीर पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे यावेळी कौतुक केले. त्यांना “हुशार आणि व्यावहारिक व्यक्ती” असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, “जर ट्रम्प सत्तेत असते तर युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेशी वाटाघाटी करणे शक्य झाले असते. युक्रेन मुद्द्यावर रशिया नेहमीच तडजोड करण्यास तयार असल्याचेही पुतिन म्हणाले. ते म्हणाले, “आम्ही नेहमीच म्हटले आहे आणि मी पुन्हा सांगतो की आम्ही युक्रेन मुद्द्यावर वाटाघाटी करण्यास तयार आहोत.”असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रशियाने कीव सरकारला “बेकायदेशीर राजवट” म्हटले आहे. vladimir putin on Ukraine War।
पुतिन यांचे विधान रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या अलीकडील विधानाशी जुळत नाही. मंत्रालयाने पाश्चात्य देशांकडून युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा केल्याचा निषेध करत कीव सरकारला “बेकायदेशीर राजवट” म्हटले. “शांतत्याबाबत चर्चा करूनही, पश्चिम आणि कीवकडून खऱ्या अर्थाने तयारीचे कोणतेही चिन्ह दिसत नाही,” असे निवेदनात म्हटले आहे.
पुतिन-ट्रम्प चर्चेला युक्रेनचा निषेध vladimir putin on Ukraine War।
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या कार्यालयाने पुतिन-ट्रम्प चर्चा नाकारली आहे. युरोपियन प्रतिनिधींच्या सहभागाशिवाय कोणतीही शांतता चर्चा शक्य नाही. युद्ध संपवण्यासाठी व्यापक सहभाग आवश्यक असल्याचे झेलेन्स्की यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.
२४ तासांत युद्ध संपवण्याचा ट्रम्पचा दावा
जर ते सत्तेत असतील तर ते रशिया-युक्रेन युद्ध २४ तासांत संपवू शकतात असा दावा ट्रम्प यांनी यापूर्वी केला होता. मात्र ते राष्ट्रपती झाल्यानंतरही, युद्ध सुरूच आहे. रशिया आणि युक्रेन या दोघांवरही दबाव आणून ट्रम्प शांतता करार करण्याचा प्रयत्न करू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्याच वेळी, ट्रम्प यांनी यापूर्वी इशारा दिला होता की जर रशिया चर्चेसाठी तयार नसेल तर ते कठोर निर्बंध लादतील आणि युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा वाढवतील.





