Vivek Oberoi | अभिनेता विवेक ओबेरॉयने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु सध्या तो सिनेक्षेत्रापासून दुर असल्याचे दिसते. अलीकडेच त्याने एका मुलाखतीत ‘हम तुम’, ‘मुन्नाभाई MBBS’ आणि ‘ओम शांती ओम’चा भाग होण्यास नकार दिल्याचा खुलासा केला आहे. तसेच यामागचे कारणही त्याने सांगितले आहे.
विवेक ओबेरॉयला शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटात खलनायकाची भूमिका ऑफर झाली होती. पण, त्याच दरम्यान प्रदर्शित झालेल्या ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ चित्रपटात विवेकने गँगस्टरची भूमिका साकारली होती.
याबाबत विवकने सांगितले की, “दोन्ही चित्रपटातील माझ्या भूमिका या नकारात्मक पात्राच्या होत्या आणि आमच्या शूटिंगच्या तारखा सुद्धा क्लॅश होत होत्या. ज्यावेळी फराहने मला भूमिकेसाठी ऑफर दिली, तेव्हा मी माझ्या ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ सिनेमातील व्यक्तिरेखेसाठी अभ्यास करायला सुरुवात केली होती.
क्राइम डायरीज वाचल्या होत्या, पोलिसांना भेटलो होतो. त्या रोलसाठी मी ४ ते ५ महिने आधीच तयारी सुरू केली होती. मग, त्या क्षणाला सगळ्या गोष्टी अगदी झटपट बदलणं शक्य नव्हते. पण अर्जुनने रामपालने ती भूमिका उत्तमप्रकारे साकारली असल्याचा मला आनंद आहे,” असे विवेकने यावेळी सांगितले.
पुढे त्याने सांगितले, “जर परिस्थिती वेगळी असती तर त्याने शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या ॲक्शन ड्रामा चित्रपटासाठी नक्कीच हो म्हटलं असतं. माझ्या कारकिर्दीत शाहरुख खानसोबत काम करणे खूप छान आहे. ‘ओम शांती ओम’च्या निमित्त मला शाहरुखसोबत काम देखील मला करता आलं असतं. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला त्या च्याबरोबर फक्त ‘साथिया’च्या निमित्ताने काम करण्याची संधी मिळाली होती. त्या चित्रपटात शाहरुखने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.”
फराह खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि अर्जुन रामपाल हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. तर ‘साथिया’चं दिग्दर्शन शाद अली यांनी केलं होतं आणि त्यात विवेक ओबेरॉय आणि राणी मुखर्जी यांनी भूमिका साकारली होती.
हेही वाचा: