पिंपरी | लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी विवेक काळोखे
Updated On:

देहूगाव, (वार्ताहर) – लायन्स क्लब ऑफ देहूगावच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विवेक वसंत काळोखे यांची निवड करण्यात आली आहे.
तर उपाध्यक्षपदी स्वीकृत नगरसेवक प्रदीप परंडवाल, खजिनदार पदी सचिन आवारे, सचिव पदी प्रथमेश आहिरे यांची कार्यकरणीवर निवड करण्यात आली आहे. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अभय शास्त्री आणि रवींद्र गोलार यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सतीश आवारी, वैभव हराळे, नितू सिंग, स्वीकृत नगरसेवक प्रदीप परंडवाल, मधुकर यादव, इंदोरी गावचे उपसरपंच धनश्री काशीद यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मावळते अध्यक्ष प्रकाश कांबळे, शैलेजा सागळे, शशांक फालके यांसह लायन क्लबचे आजी-माजी सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.





