Sangli News : महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकाणाऱ्या एकाला अटक
Sangli News : सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या एका अट्टल चोरट्याला विटा पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे.

Sangli News : महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला विटा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनोद गोविंद पिंपळे (वय ४२, मूळ रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर, सध्या रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यास ताब्यात घेतले आहे. (Sangli News)
विटा पोलीस ठाण्यात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरी केल्याप्रकरणी तपास सुरू होता. चंद्रदेवी महेश हजारे (वय ४३, रा. विटा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसडा मारून पळ काढला होता. (Sangli News)
या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान विटा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित विनोद गोविंद पिंपळे यास ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत संशयिताने विटा पोलीस ठाणे हद्दीतील दोन साखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. (Sangli News)
पोलिसांनी चोरट्याकडून सोन्याचे गंठण (सुमारे ३० ग्रॅम शुद्ध सोने) किंमत ४,१०,००० रुपये, गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची जुनी दुचाकी किंमत ७०,००० रुपये एकूण जप्त मुद्देमाल ४ लाख ८० हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Sangli News)
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पथकातील पोहेकॉ अमोल पाटील, पोहेकॉ उत्तम माळी, पोहवा अमोल कराळे, पोहवा किरण खाडे, पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख, महेश संकपाळ व अक्षय जगदाळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. (Sangli News)





