Norway Chess 2022 : आनंदची वासेलिन टोपालोव्हवर मात
Updated On:

स्टॅवेंगर (नॉर्वे) – भारताचा ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने येथे सुरू झालेल्या नॉर्वे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या क्लासिकल गटात गुरुवारी झालेल्या दुसऱ्या फेरीत माजी जागतिक विजेता वासेलिन टोपालोव्ह याच्यावर मात करत सलग दुसरा विजय नोंदवला.
यापूर्वी आनंदने पहिल्या फेरीत वेशर लॅग्रेव्हचा पराभव केला होता. टोपालोव्हविरुद्ध झालेल्या लढतीत आनंदने केवळ 36 चालींमध्येच विजय प्राप्त केला. या विजयाच्या जोरावर गुणतालिकेत आनंद 6 गुणांसह आघाडीवर आहे. टोपालोव्हने ब्लिट्झ प्रकारात विजय मिळवत क्लासिकल गटात प्रवेश केला होता. मात्र, आनंदने त्याला एकही संधी दिली नाही.





