Pune News : विश्रामबाग पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश; १० लाखांच्या १४ दुचाकी जप्त
Pune News : पुणे शहरातील विश्रामबाग पोलिसांनी दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करत एका विधीसंघर्षित बालकासह एका अट्टल चोराला ताब्यात घेतले आहे.

Pune News : विश्रामबाग पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एका विधीसंघर्षित बालकासह कृष्णा चंद्रकांत शेळके (वय २६, रा. माळेगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) याला ताब्यात घेतले असून, फरार आरोपी वैभव सांगुळे (रा. सुतारदरा, कोथरूड, पुणे) याचा शोध सुरू आहे. (Pune News)
या टोळीने पुणे शहरासह इतर जिल्ह्यांतून चोरी केलेल्या सुमारे १० लाख रुपये किमतीच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. नवी पेठेतील चिमणबाग सोसायटी परिसरातून २३ जून रोजी एमएच ३७ एबी ३८७२ क्रमांकाची होंडा शाइन दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. (Pune News)
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नारायण पेठ परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी दोन संशयितांपैकी एक जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला, तर विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. (Pune News)
चौकशीत त्याने वैभव सांगुळे याच्यासह पुणे व इतर जिल्ह्यांतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथून कृष्णा शेळके याला ताब्यात घेतले. (Pune News)
तपासात विश्रामबाग पोलीस ठाण्यातील दोन, तसेच समर्थ, हडपसर, काळेवाडी, भारती विद्यापीठ आणि विमानतळ पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एक असे गुन्हे उघडकीस आले. याशिवाय इतर जिल्ह्यांतील पाच गुन्ह्यांचीही उकल झाली आहे. एकूण १२ गुन्हे उघडकीस आले असून, उर्वरित दोन दुचाकींबाबत तपास सुरू आहे. (Pune News)
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, मेहबूब मोकाशी तसेच पोलीस अंमलदार अमोल भोसले, नितीन मुंढे, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशीकांत दरेकर, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जुन थोरात, भास्कर गायकवाड आणि उमेश गव्हाणे यांनी केली. (Pune News)
Pune Crime News: रक्ताचे डाग धुवून कॅफे पुन्हा सुरू; पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मालकासह दोघांना अटक





